393 Crore GST Scam Case : साहील जैनच्या Relatives च्या घरावर छापा, सापडली 40 लाखांची Cash

टिओडी मराठी, लुधियाना (सेठी), दि. 22 जून 2021 – जीएसटी आर्थिक घोटाळा प्रकरणी साहिल जैनच्या नातेवाईकाच्या घरावर लुधियानाच्या सीजीएसटी आयुक्तालयाच्या अॅंटी इव्हॅजन विंगने छापा टाकला आहे. साहिल जैनच्या नावावर असलेल्या सुमारे 393 कोटी रुपयांच्या जीएसटी फसवणूकप्रकरणी तपासादरम्यान ही कारवाई केली आहे.

येथून सुमारे 40 लाख रुपये रोख जप्त केलेत. जीएसटी फसवणूक प्रकरणातील हे मोठे नाव असलेल्या साहिल जैनला 11 नोव्हेंबर 2020 मध्ये 393 कोटी रुपयांचे बनावट बिलिंग रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

या घोटाळ्यात संबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे साहिल जैनच्या नातेवाईकांच्या घरात लपवून ठेवली आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर विभागाने शनिवारी तपास अभियान सुरू केले.

साहिल जैनचे दूरच्या नात्यातील एका योगेश जैन यांच्या घरी ही कारवाई झाली आहे. घरात तपास सुरू असताना एका बेडरूममधील कपाटातून सुमारे 40 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.

चौकशी दरम्यान योगेश यांनी जीएसटी चोरीमध्ये सहभागी आहे, असे कबूल केले. योग्यप्रकारे चलन जारी न करता विविध वस्तू मिळविण्यासाठी कच्चे बिल तयार करून जीएसटीची चोरी केली जात आहे, असे त्याने सांगितले.

याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, जीएसटी चोरी प्रकरणातील किंग पिन साहिल जैन सध्या फरार असून विभागाचे अधिकारी त्याच्या नातेवाइकांच्या मागावर आहेत. या दरम्यान योगेश जैनने केलेल्या जीएसटी चोरीचा खुलासा झाला. साहिल न्यायालयामध्ये खोटी सिक्युरिटी देऊन जामीन मिळवण्यात यशस्वी झाला होता. त्याचा शोध सध्या सुरूय.

Please follow and like us: