TOD Marathi

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीतही पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार अशी आशा सामान्य माणसाने केली होती त्यावर मात्र आता पानी फेरले आहे. अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या चौकटीत आणण्यास विरोध केला.

या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत सामील करण्यावरून अनेक राज्यांनी विरोध दर्शवला त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या चौकटीत आणण्याची ही योग्य वेळ नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं. दुसरीकडे, करोना व्यतिरिक्त महाग जीवनरक्षक औषधं आहेत त्यांना सूट देण्यात आली आहे. त्या औषधांवर जीएसटी नसेल असं, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.

या बैठकीकडे देशभरातून सामान्य नागरिकांचे लक्ष होते. त्यांना आशा होती की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, मात्र सामान्य नांगरिकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली. केरळ हायकोर्टात या विषयावर एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर केरळ हायकोर्टाने सांगितले की हा विषय जीएसटी परिषदमध्ये आधी घेतला जावा, त्यानुसार हा विषय घेतला, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं.