TOD Marathi

यंदाही Amarnath Yatra रद्द; 25 हजार कुटुंबाची बुडाली रोजीरोटी, व्यावसायिकांत नाराजी

टिओडी मराठी, दि. 22 जून 2021 – करोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा होऊ शकणार नाही, असे जाहीर केले आहे. वर्षातून एकदा होणाऱ्या या यात्रेवर वर्षभराची कमाई करणाऱ्या सुमारे 25 हजाराहून अधिक लोकांची रोजीरोटी यामुळे बुडाली आहे. यात्रे दरम्यान घोडेवाले, पिटूवाले, डोलीवाले, हॉटेल, टॅक्सीचालक आणि पर्यटन व्यावसायिक आदींना नुकसानीचा मोठा फटका बसणार आहे. कारण या यात्रेतून त्यांची वर्षांची कमाई होत असते. त्यामुळे या वर्गात नाराजी पसरलीय.

दरवर्षी या यात्रेसाठी २ ते ३ लाख नोंदणीकृत यात्रेकरू येत असतात. नोंदणी न केलेले भाविक सुद्धा बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी येतात. पहेलगाम आणि बालताल अशा दोन मार्गांनी ही यात्रा करता येते.

यात्रा काळात दरवर्षी राजोरी, पूंछ, उधमपूर, रियासी, रामबन, काश्मीर जिल्ह्यातून १५ हजार घोडेवाले, ५ ते ६ हजार पिटूवाले, ५ हजार डोलीवाले इथं येतात. जम्मूमधून ६ हजार प्रवासी टॅक्सी येतात. या सर्वांना अमरनाथ यात्रा रद्द झाल्याचा फटका बसणार आहे.

मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे गेले दीड वर्ष या लोकांना कमाई झाली नाही. पर्यटन व्यवसायाला सुद्धा त्यामुळे नुकसान सोसावे लागले आहे.

आता भाविकांना बर्फानी बाबांचे दर्शन ऑनलाईन मिळणार आहे. तसेच बालताल मार्गावर सुरक्षारक्षक पवित्र गुहेच्या संरक्षणासाठी तैनात केलेत, असे समजते.