TOD Marathi

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोना संसर्ग झाला होता. करोनामुळं प्रकृतीबद्दल समस्या निर्माण झाल्यानं सोनिया गांधी यांना नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Sonia Gandhi admitted in Gangaram Hospital) काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. १२ जून रोजी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नाकातून रक्त येत असल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात होतं. सोनिया गांधी यांच्यावर गंगाराम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, असंही जयराम रमेश म्हणाले. (Congress leader Jayram Ramesh informed about Sonia Gandhi’s health)

सोनिया गांधी यांना श्वसनासाठी त्रास होत असल्याचं समोर आलं होतं. सोनिया गांधी यांच्या श्वसननलिकेत संसर्ग झाल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्यावर गंगाराम रुग्णालयत उपचार सुरु आहेत. करोना संसर्गानंतर त्यांना प्रकृतीसंदर्भात अडचणींचा सामना करावा लागला आहे. सोनिया गांधी यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २ जून रोजी करोना संसर्ग झाला होता. दरम्यानच्या काळात ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीला हजर राहण्याच समन्स बजावलं होतं. ईडीनं सोनिया गांधी यांना आता २३ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, करोनासंसर्गानंतर सोनिया गांधी यांना प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली आहे. राहुल गांधी १३ जूनपासून ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहेत. तर, राहुल गांधी यांना ईडीनं आज चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, सोनिया गांधी रुग्णालयात असल्यानं त्यांच्या देखभालीसाठी राहुल गांधी यांना वेळ देण्यात आला आहे. ईडीकडून राहुल गांधी यांची चौकशी आता २० जून रोजी करण्यात येणार आहे. तर, सोनिया गांधी २३ जूनला ईडी चौकशीला उपस्थित राहणार का? हा प्रश्न कायम आहे.