TOD Marathi

अमरनाथ :
अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 65 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. (16 died and more than 65 injured) त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय तब्बल 40 जण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

जे बेपत्ता आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस आणि लष्कराद्वारे युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. (Rescue operation is being done)

या सर्व पार्श्वभूमीवर खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला सध्या ब्रेक (Stay on Amarnath Yatra) लावण्यात आला आहे. हवामान व्यवस्थित झाल्यावर पुन्हा यात्रेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिला आहेत. अन्य तीन मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.

या ढगफुटीच्या दुर्घटनेत तब्बल 65 लोकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे काश्मीरमधील आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुट्या देखील रद्द केल्या आहेत. या सर्व घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे. (JK Administration on alert mode)

#AmarnathYatra