टिओडी मराठी, दि. 4 ऑगस्ट 2021 – विविध मागण्यांसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने नुकतेच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर केले. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील दिला आहे.
मोडलेल्या शिक्षण व्यवस्थेला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून होती. मात्र, त्यांनीही शिक्षणाच्या प्रश्नांवर कुठलीही भरीव तरतूद केलेली नाही अथवा सामान्यांना कुठलाही दिलासा दिला नाही.
हे पुरोगामी सेक्युलर विचारधारेच्या काॅग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षात घ्यायला हवे. तातडीने छात्रभारतीच्या मागण्या मान्य करून राज्यातील गरीब सामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करावे, यासाठी संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले आहे.
कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकावा, यासाठी विद्यार्थी हिताच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय व्हावा , अशी मागणी केलीय. सकारात्मक निर्णय न झाल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.
या आंदोलनामध्ये छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले, संघटक सचिन बनसोडे, अनिकेत घुले, गणेश जोंधळे, मुंबईच्या अध्यक्ष दिपाली आंब्रे, जितेश किर्दगुडे, विकास पटेकर, सचिन काकड सह 25 कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या मागण्या –