TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 4 ऑगस्ट 2021 – ओशोच्या 7 अनुयायांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन ओशो फाउंडेशनच्या ट्रस्टी आणि मॅनेजमेंटवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तसेच मनी लाँड्रिंग आणि परकीय चलनासंबंधीत नियमांचे उल्लंघन केलं आहे, असे आरोपही केलेत. ओशो फ्रेंड्स फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश ठक्कर यांनी पुण्यातील कोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये एक लिखित पत्र देऊन तक्रार दाखल केलीय. परंतु यासंदर्भातील FIR अजून दाखल झालेला नाही.

योगेश ठक्कर यांनी त्यांच्या तक्रारीत असे म्हटले की, परदेशामधील ओशोंच्या अनुयायांकडून पुणेस्थित ओशो आश्रमातील कार्यासाठी डोनेशन घेतले जाते. परंतु चॅरिटी कमिश्नर मिळालेल्या डोनेशनमधील सर्वाधिक पैशांचे व्यवहार फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटच्या कोणत्याही परवानगीशिवाय भारतबाहेर अवैध्यरित्या करत आहेत. पब्लिक ट्रस्ट प्रॉपर्टीच्या गैरव्यवहाराचे हे एक उत्तम आहे, असे आरोपही यात केलेत.

जगात ओशोंचे कोट्यावधी अनुयायी आहेत. या अनुयायांकडून ओशो फाउंडेशनला अधिक प्रमाणात डोनेशन मिळते. मात्र, या तक्रारीत असे सांगण्यात आले की, या फाउंडेशनच्या व्य़वहारांसंदर्भात सखोल चौकशी केल्यास एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा उघडकीस येणार आहे.

ओशोंच्या 7 अनुयायांनी इकोनॉमिक ऑफेंस विंग आणि पुणे पोलिसांच्या एसआयटीच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिलेत.