टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 सप्टेंबर 2021 – विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी ठाकरे सरकारकडून आदर्श शाळा बांधण्यात येणार आहे. यामार्फत आता मार्च महिन्यात निवडलेल्या सुमारे 488 शाळांसाठी राज्य सरकारकडून 494 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार असून विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत.
आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडणार आहे. तसेच आदर्श शाळांचे बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आदर्श शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक निधी ई गव्हर्नंसच्या निधीमधून उपलब्ध करून देणार आहे.
शासकीय निकषांवर पात्र ठरणाऱ्या शाळांची निवड आदर्श शाळांसाठी करणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे.
‘अशी’ होणार शाळांची निवड –