युवराज सिंग परतणार मैदानावर; सोशल मीडियावरून दिली माहिती

Yuvraj Singh - TOD Marathi

मुंबई: युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत देत सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

युवराज सिंग हा एक पक्का खेळाडू म्हणून त्याच्याकडे पहिलं जातं, त्याने सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारलेले अजूनही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात आहे. मात्र पुन्हा मैदानात उतरण्याच्या युवराजच्या दाव्यामध्ये किती ताकद आहे, हे वेळ आल्यावरच कळेल. युवराजने अपलोड केलेला व्हिडिओ इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या १५० धावांच्या खेळीचा आहे.

सोशल मीडियावर स्वत:चा हा व्हिडिओ पोस्ट करताना युवराजने लिहिले आहे की, तुमचं नशीब देव ठरवतो. जनतेच्या मागणीनुसार मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरेन. या भावनेपेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. यासाठी मी सर्वांचा आभारी राहीन.

Please follow and like us: