TOD Marathi

मुंबई | वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. रोहित आणि कोहलीला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देणे अनेक दिग्गज खेळाडू आणि चाहत्यांना पटले नाही. आता क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

माजी खेळाडू आकाश चोप्राने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाहेर ठेवण्याच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने खराब फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हलक्यात घेतले, असे आकाश चोप्राचे मत आहे. त्यामुळेच भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंना मैदानात उतरवले नाही.

हेही वाचा ” …भाजप मंत्र्याचं ठाकरेंना आवाहन; म्हणाले…”

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “जर हे कारण असते तर तुम्हीही अशा सामन्यात आऊट होऊ शकला असता की तुमचा संघ १५० धावांवर आऊट झाला असता. जसे तुम्ही १८१ धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने शाई होपला विश्रांती घ्यायला सांगावी का? कारण हा भारतीय संघ खूप कमकुवत आहे. माझ्या मते खरोखर कोणालाही विश्रांती देण्याची गरज नाही. कारण विश्वचषक फार दूर राहिलेला नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात काही अर्थ नाही, असे आकाश चोप्राने पुढे सांगितले. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “दुसरा मुद्दा असा असू शकतो की खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे, भरपूर क्रिकेट खेळले गेले आणि वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे.”