TOD Marathi

बारामती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हंटलं होतं. मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यावर ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे वक्तव्य करतोय, उद्धव ठाकरेंनी असा टोला मारल्यावर एकच हशा पिकली.

मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, अशी काहीशी विनोदी टोलेबाजी ठाकरेंनी केली.