TOD Marathi

दुबई: टी-20 वर्ल्ड कपमध्ये काल झालेल्या सामन्यात भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. न्यूझीलंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं ११२ रनचं आव्हान न्यूझीलंडने १४.३ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. यामुळे भारताचा नेट रन रेट अत्यंत खराब झाला आहे. आणि त्यामुळेच आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला आता स्वत:सोबतच दुसऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

दुसऱ्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्येभारतीय संघ ६ टीममध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान आणि नामिबियाची टीमही भारताच्या पुढे आहे, तर स्कॉटलंड भारताच्या मागे शेवटच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने त्यांचे तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलला पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताचा नेट रनरेट -१.६०९ आहे. त्यामुळे भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.