TOD Marathi

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, जयदीप राणांचा फडणवीसांसोबत संबंध काय, असाही सवाल केला आहे. राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवी व जयदीप राणा एकत्र आहेत. तसे फोटोही आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे. फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्जचे धंजे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. राज्यातील ड्रग्ज रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा मोठा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.