TOD Marathi

जर शेतकऱ्यांचे तंबू हटवले, तर थेट पोलिस ठाण्यात तंबू ठोकेल; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. एवढे महीने उलटूनही शेतकरी तिथून माघार घेण्यास तयार नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर तेथील प्रशासन शेतकऱ्यांचे तंबू हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर शेतकरी नेते टिकैत म्हणालेत, जर शेतकऱ्यांचे तंबू हटवले, तर शेतकरी थेट पोलिस ठाण्यात तंबू ठोकतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे काम केंद्र सरकराने सुरू केलं आहे. याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. जबरदस्तीने शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारी कार्यालयांचे मंडईत रुपांतर करू, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर शेतकरी नेते आणि युनायटेड किसान मोर्चाने आपल्या बाजूने रास्ता रोको केला नसल्याचे सातत्याने सांगितले सांगत आहेत. उलट पोलीस प्रशासनाने (दिल्ली पोलीस) बॅरिकेड्स लावून हे केले आहे, असं स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांनी दिलंय.