टिओडी मराठी, पुणे, दि. 20 जून 2021 – महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेसला टोला हाणला होता. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काँगेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असून आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही स्वबळावर लढवणार आहे. काँग्रेसने तशी तयारी सुरु केली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलत होते. मात्र, काँग्रेस 5 वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभी आहे.
आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तशी ग्वाही दिलीय. त्यामुळे काँग्रेसकडून सरकारला प्रॉब्लेम होणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हंटल आहे.
More Stories
शिवसेनेला मोठा धक्का; उदय सामंत गुवाहटीसाठी रवाना
मविआचा खेळ खल्लास? शिंदेंच्या बंडात आता फडणवीसांची एंट्री!
देवेंद्र फडणवीस १० तासांनी मुंबईत परतले, आज मोठा निर्णय होणार?