TOD Marathi

बाप तो ‘बाप’च असतो; ‘Father’s Day’ निमित्त अनेकांनी वडिलांना दिल्या शुभेच्छा !!

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 20 जून 2021 – लहान लहान संकटांना सामना करण्यासाठी आई असते. मात्र, मोठ्या संकटाचा सामना मात्र बापच करत असतो. अनेकांनी मारझोड करणारा, रागवणार, कडक आदी प्रकारचा ‘बाप’ रेखाटला, सांगितला. पण, ज्यांना बापाची माया, प्रेम भेटलं नाही त्याला विचारा बाप म्हणजे काय? बरोबर ना.. म्हणूनच बाप तो ‘बाप’च असतो.

बाबा, डॅड, अब्बू, अशा वेगवेगळ्या नावाने आपण वडिलांना जरी हाक मारत असलो तरी ‘बाप’ म्हणून हाक मारणे सध्या काहींना कमीपणाचं वाटतं. पण, आज देखील अनेक लोक आहेत जे वडिलांना ‘बाप’ म्हणून हाक मारतात.

बाप, वडील यांची प्रत्येकाच्या जीवनात एक महत्वपूर्ण भूमिका असतेच. कोणतंही मोठं संकट येऊ, प्रत्येकाला बाप आठविल्याशिवाय राहत नाही.

सध्या 21 जून रोजी फादर्स डे निमित्त अनेकजण आपल्या बापाला वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. हल्ली सोशल मीडियावर शुभेच्छाचे अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. सेलिब्रेटी यांनी देखील वडिलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ‘बापाला’ शुभेच्छा दिल्या आहेत.

‘फादर्स डे’ बाबत :
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अनेक देशात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोय. ‘फादर्स डे’ सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला होता.

सोनेरा डोड यांनी आपला सांभाळ करणाऱ्या वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. पुढे भारतात देखील हा दिवस स्वीकारून साजरा केला जातोय. या खास दिवसाच्या तुम्हाला सर्वांना सुद्धा खूप शुभेच्छा, हॅप्पी फादर्स डे !!