TOD Marathi

सरकार पाडण्याचा नाही, तर आम्ही दुसराच Plan आखतोय ; रावसाहेब दानवे यांनी फोडलं BJP चं सिक्रेट

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 जुलै 2021 – केंद्रामधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काही संबंध नाही. आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्ही 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केलीय, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. असं सांगत दानवे यांनी भाजपचे सिक्रेट फोडलं आहे.

जनता 2024 च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असून या सरकारमध्ये वाद आहेत. त्यामुळे ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. तसेच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधी केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असे वक्तव्य केलं नाही. मागील सहा महिन्यात तर नाही नाही, असे दानवे म्हणाले.

राज्यातील सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारी सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा दानवे यांनी केलाय.

दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दोन तास चर्चा झाली आहे. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध झाले होते.

फडणवीस-मोदी आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण यामुळे ठाकरे सरकार कोंडित सापडलं आहे. अशात भाजपने सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे, अशी चर्चा आहे.