बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून सतत चर्चेत असलेले रितेश आणि जेनेलिया देशमुख (Riteish-Genilia Deshmukh in trouble) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. दोघांनी मागील वर्षी त्यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची घोषणा केली होती. मात्र, आता ही कंपनी आणि रितेश – जेनेलिया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण या कंपनीच्या जागेवरून आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जावरून वाद निर्माण झाला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्यावर भाजपनं गंभीर आरोप केले आहेत. (BJP leaders alleged Riteish and Genelia Deshmukh) या वादात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देखील संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. मात्र काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या.
23 मार्च 2021 ला कंपनीची नोंद करण्यात आली. तेव्हा रितेश आणि जेनेलिया दोघेही त्याचे मालक होते. रितेश जेनेलिया यांची 50-50 टक्के यामध्ये भागीदारी होती. सुरूवातीला कंपनीचं भांडवल 7.50 कोटी रुपये होतं. पण त्यानंतर कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले. कंपनीने 5 एप्रिल 2021मध्ये लातुरातील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये अर्ज केला आणि हा अर्ज 15 एप्रिल 2021 ला मंजूर झाला व कंपनीला जागा मिळाली. अवघ्या 10 दिवसात रितेश जेनेलियाला जागा कशी मंजूर झाली यावर भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.
भाजपचे लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मोरे (BJP Latur City District Vice President Pradeep More) यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी म्हटलंय, “2 वर्ष 16 लोकांचं वेटींग असताना केवळ प्राधान्य या सदराखाली मंत्र्यांचा भाऊ असल्यानं त्यांना ही जमीन देण्यात आली”, असा आरोप त्यांनी केला आहे. 10 दिवसात भूखंडाचं वाटप कसं काय करण्यात आलं? याची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
लातूर एमआयडीसीमध्ये असलेल्या जागा या लातूरमधील व्यापारांना मिळाल्या पाहिजेत. 16 लोकांची नाव यादीत असताना ती डावलून आमदारांनी ही जागा 10 दिवसात देऊन टाकली याची चौकशी व्हावी”, असं भाजप आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांनी म्हटलं आहे. (MLA Sambhaji Patil Nilangekar)
मात्र हे सर्व आरोप रितेश देशमुखने फेटाळून लावले आहेत. रितेशने हे आरोप फेटाळले असले तरी आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार हेही लवकरच कळेल.