घशाच्या खवखवीवर Apple Cider Vinegar आहे रामबाण उपाय ; जाणून घ्या Healthy गुणधर्म

टिओडी मराठी, दि. 2 जुलै 2021 – अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक रोग दूर राहतात. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद व यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवतात. हे केवळ एक पेयच नव्हे तर, त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे व अ‍ॅसिड असतात. घशाच्या खवखवीवर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे रामबाण उपाय आहे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर असे तयार करावे :
एक ग्लास गरम पाणी प्यावे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन चमचे मध घालून प्यावे. एका ग्लासमध्ये एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेऊन प्यावे.

घशाची खवखव दूर करण्यासाठी तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करून एक प्रभावी मिश्रण तयार करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दालचिनी, एक मोठा चमचा लिंबू एकत्र करून चहासारखे पिऊ शकता. किंवा गरम करून त्याच्या गुळण्या करू शकता.

घशाच्या खवखवीवर मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्या जातात. तुम्ही एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर मीठाच्या पाण्यात घालून गुळण्या करू शकता.

(टीप : हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आहारतज्ञ, डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.)

Please follow and like us: