TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 19 जून 2021 – अमेरिकेने अँटी कोविड टॅब्लेट बनविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. ही गोळी विकसित करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स खर्चाची तयारी दर्शविली आहे. ही गोळी करोना विषाणूच्या संक्रमणापासून मनुष्याला वाचावेल. 2021 अखेरी ही गोळी तयार होईल आणि त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीची घोषणा अमेरिकेचे संक्रमण रोगतज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी व्हाईट हाउस ब्रीफिंगमध्ये केलीय.

सध्या करोनावर जी औषधे उपलब्ध आहेत, ती करोनाची लागण झाल्यानंतर लक्षणे कमी करण्यासाठी आहेत. अँटी कोविड टॅब्लेटचे काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे. त्याची परीक्षणे लवकरच सुरु होणार आहेत.

2021 अखेरी चाचण्या पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले तर हे काम वेगाने होणार आहे. प्रसिद्ध फार्मा कंपनी मर्कमध्ये यावर काम सुरु आहे, असे समजते.

तसेच भविष्यात अनेक विषाणू पासून असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेच्या स्वास्थ्य आणि मानव सेवा विभागाने गुरुवारी महामारीशिवाय अन्य आजारांवर औषधे तयार केली जात आहेत, असे संकेत दिलेत.

मागील वर्षात १८ अब्ज डॉलर्स खर्च करून रेकॉर्ड वेळात करोनावरील पाच लसी विकसित केल्या आहेत. नवीन जी गोळी तयार होत आहे, त्यामुळे करोनाचा विषाणू सुरवातीला नष्ट होईल.