TOD Marathi

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 19 जून 2021 – कर्नाटकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून पक्षातील नेत्यांनी 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री हटविण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आला आहे.

कर्नाटक राज्यात भाजपमध्ये कलह दिसून येत आहे. येथे मुख्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. यात, एक अथवा दोन लोक मिडियाशी बोलत आहेत. एवढेच नाही, तर पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अरूण सिंह यांनीही त्यांना भेट दिलेली नाही. अशात कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हंटलं आहे.

याबाबत मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, जर काही मुद्दा असेल तर आम्ही त्यावर चर्चा करू. 2-3 सदस्यांच्या शंकेचे समाधान करू. मी भाजपचे विधान परिषद सदस्य एएच विश्वनाथ यांच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या संदर्भात निर्णय घेतील. याअगोदर कर्नाटक भाजपत कलह वाढण्यासंदर्भात आणि मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना हटविल्या जाण्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात असताना राज्याचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी गुरुवारी आमदारांसोबत भेट घेतली.

यावेळी सिंह यांनी पक्षात एकी आहे आणि काही नाराज आमदार सरकार आणि त्यांच्या नेतृत्वाविरोधात वक्तवे करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी अशा नेत्यांना इशारा देत, त्यांच्या अशा वागण्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचलाय, असेही म्हटले आहे.

विश्वनाथ यांनी उघडपणे येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी केली आहे. त्यांचा छोटा मुलगा आणि कर्नाटक भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केलाय.

याबाबत विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले कि, भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात 20 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेतली नाही, मंडळाची बैठक घेतली नाही. हे घाईघाईने केले आहे.

भाजपचे नाराज विधानपरिषद सदस्य ए. एच. विश्वनाथ यांनी शुक्रवारी, पाटबंधारे विभागाने 21,473 कोटी रुपयांची निविदा कुठल्याही प्रकारची वित्तय मंजुरी न घेता घाईघाईने तयार केली आणि यात घोटाळा झाला आहे, असे म्हटले आहे.