अमेरिकेने तब्बल १५७ पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या!

PM MODI - TOD Marathi

न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात येणार आहेत.

या १५७ वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कलाकुसरीच्या गोष्टींचा समावेश आहे. यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच १२व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती देखील आहे.

शिवाय यातल्या साधारण ४५ कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. त्यात अनेक बौद्ध, हिंदु आणि जैन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्ती आहेत. तर अर्ध्यापेक्षा जास्त कलाकुसरीच्या वस्तू या भारतीय संस्कृतीच्या आहेत.

Please follow and like us: