TOD Marathi

मुंबई : यंदाचा T20 वर्ल्ड कप (T20 World cup) ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. मात्र वर्ल्ड कपच्या आधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातूनबाहेर झाला आहे. आता टीममध्ये त्याच्याजागी कोण खेळणार? हा प्रश्न आहे. दरम्यान या सगळ्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराहकडून रिएक्शन आली आहे.

जसप्रीत बुमराहने केलेल्या ट्वीटमध्ये त्याला झालेलं दु:ख स्पष्टपणे दिसून येतय. पण एक चांगली बाब ही आहे की, तो व्यक्तीगत दु:ख बाजूला ठेवून टीम इंडियाला सपोर्ट करणार आहे.

 

“मी यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाहीय, याचं मला दु:ख आहे. ज्यांनी सतत मला प्रेम आणि पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे. आता रिकव्हरी दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये मी टीम इंडियाला सपोर्ट करीन” असं बुमराहने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उत्साह वाढवणार आहे. पण त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न आहे. बुमराह बाहेर गेल्यानंतर टीमसमोर हा मोठा प्रश्न आहे. आता बुमराहच्या जागी पर्याय म्हणून दीपक चाहर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे तीन पर्याय आहे. पण बुमराहच्या जागी कोण येणार? ते अजून स्पष्ट झालेलं नाही.