TOD Marathi

नवी दिल्ली | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव होऊन अनेक आठवडे झाले, पण खेळाडूंच्या हृदयात अजूनही वेदना कायम आहेत. विशेषत: रविचंद्रन अश्विन, ज्याला संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आणि नंतर भारताचा २०९ धावांनी लाजीरवाणा पराभव पाहिला. या पराभवामुळे भारताची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबली. आता अश्विनने एका मुलाखतीत कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मोठं भाष्य केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनने एकूण ६१ विकेट घेतले आहेत. यूट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात अश्विनने पॅट कमिन्सचे कौतुक केले आणि म्हटले, ‘अभिनंदन ऑस्ट्रेलिया! तो एक उत्तम अंतिम सामना होता. लाबुशेन सतत काऊंटी क्रिकेट खेळत होता, जे कांगारूंच्या बाजूने महत्त्वाचे ठरले.

हेही वाचा “……म्हणून चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले…”

अश्विनच्या डोक्यात अजूनही WTC पराभवाची खंत आहे, रोहित आणि द्रविडकडे बोट दाखवत धोनीबद्दल मोठं वक्तव्य केले, म्हणाला त्याने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. निवडलेल्या संघातील खेळाडूंना दिलेली सुरक्षिततेची भावना हे धोनीच्या यशामागील कारण असल्याचे अश्विनने सांगितले.

तो म्हणाला, ‘मला चाहत्यांबद्दल सहानुभूती आहे, पण कोणताही खेळाडू एका रात्रीत बदलत नाही. आपल्यापैकी बरेच जण एमएस धोनीच्या नेतृत्वाबद्दल बोलतात. त्याने काय केले? त्याने गोष्टी अगदी साध्या ठेवल्या. मी अनेक वर्षे माहीच्या कर्णधारपदाखाली खेळलो. तो १५ जणांचा संघ निवडायचा. त्यानंतर त्याच १५ जणांना पुढील संघातही संधी तो ध्यायचा. वर्षभर तो एकच प्लेइंग इलेव्हन खेळवायचा. सुरक्षेची भावना खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असते.