TOD Marathi

बुलडाणा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत असलेल्या नोटीसाबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा केंद्र सरकार विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस दिल्या जात आहेत. ही आजकाल फॅशन झाली आहे. आधी ज्याप्रमाणे पोस्टातून कार्ड यायची त्याप्रमाणे आता ईडीकडून नोटिसा यायला लागल्या आहेत. हे या देशाचे दुर्दैव असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

या दौऱ्यात माँ जिजाऊच्या राजवाडा येथे जाऊन राजवाड्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर लवकरच अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून सिंदखेड राजा विकासा संदर्भात बैठक लावण्यात येईल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.