TOD Marathi

आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार गुलाब चक्रिवादळ; महाराष्ट्रात पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गुलाब चक्रिवादळ आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा परिणाम जाणवणार असून राज्यात चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांत सात किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे गुलाब चक्रिवादळ तीव्र झाले आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागासाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास हे चक्रिवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागात प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे अवाहन करण्यात आले आहे. या चक्रिवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडणार असून राज्यात चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.