TOD Marathi

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी आपल्या हातात घेताच कंपनीत वेगवेगळे बदल सुरू केले आहेत. ट्विटरने आता आपली सशुल्क ब्लू टिक्स सेवा सुरू केलीय (Twitter has now launched its paid Blue Tix service). दरम्यान मस्क यांनी ब्लू टिक्ससंदर्भात आता एक नवीन घोषणा केली आहे. ज्यामुळे अनेकजणांचे अकाऊंट सस्पेंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवारी म्हणजे आज सकाळी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्विट करत आपल्या युजर्सला नवीन अपडेट दिली आहे. आपली ओळख बदलणारे प्रत्येक अकाउंट इथूनपुढे सस्पेंड केले जाईल. पॅरोडी अकाउंट असल्यास ते पॅरोडी अकाउंट आहे असं स्पष्टपणे लिहावे, नाहीतर कोणाचे नाव अथवा फोटो वापरणारे अकाउंट सस्पेंड केले जाईल.

आम्ही याआधी अकाउंट सस्पेंड करण्यापूर्वी एक चेतावणी दिली होती, परंतु आता आम्ही व्यापक पडताळणी सुरू करत आहोत. त्यानुसार, कोणत्याही चेतावणी शिवाय थेट अकाउंट सस्पेंड केले जातील. तसेच ट्विटर ब्लूवर साइन अप करण्याची अट म्हणून हे स्पष्टपणे ओळखले जाईल असं देखील एलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

समजा कोणी ट्विटर आपले युजरनेम बदलले तर त्याचे ब्लू टिक हे तात्पुरते काढून टाकले जाईल, असंही एलॉन मस्क म्हणालेत. दरम्यान, अलीकडे असे अनेक अकाउंट सस्पेंड केली गेली आहेत, जी दुसऱ्याचे पॅरोडी अकाउंट म्हणून काम करत आहेत. खरंतर, मस्क यांच्या नावानेही ट्विटर अनेक बनावट अकाउंट्स सुरू होती, जी सतत सस्पेंड केली जात आहेत.

असंच एक पॅरोडी अकाउंट ज्याचं नाव होतं इयान वूलफोर्ड हे अकाउंट
एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नावाने हिंदी भाषेतही चालू होते. ते देखील सस्पेंड करण्यात आले आहे. इयान वुलफोर्ड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलचे नाव बदलून एलन मस्क ठेवले होते. शिवाय प्रोफाइल आणि कलर फोटो देखील मस्क यांचा वापरला होता. इयान वूलफोर्ड हे मस्क यांच्या नावाने ट्विट करत होते, त्यानंतर त्यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले.