TOD Marathi

मुंबईः
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचा दावा केला आहे (Sambhaji Brigade has claimed that the film has shown wrong history). ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाइलने बंद पाडेल, असा इशाराच देण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटात इतिहासाची चेष्टा करण्यात आली आहे. शूरवीरांच्या कर्तृत्वाबाबत खोडसाळपणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे आणि केंद्रीय कार्यकारणीची ऑनलाइन बैठक झाली (Sambhaji Brigade President Manoj Akhre, General Secretary Saurabh Khedekar, Regional Spokesperson Dr. An online meeting was held between Shivanand Bhanuse and the central executive). त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासी वेषात दाखवण्याचा मुर्खपणा केला आहे. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखं आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे जेधे यांना शिपाई करण्यासारखे आहे, असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

छत्रपतींना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतींवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजालखानाचा वकील होता. त्याने छत्रपतींवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला, असं खोट दाखवलं आहे, असाही आक्षेप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

दरम्यान, ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव’ चित्रपट तयार केलाय, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला आहे.