TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 जुलै 2021 – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार आहे. कारण मुंबई पोलिसांनी बुधवारी परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असणार आहेत.

एका बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाच जणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना या प्रकरणात अटक केली आहे. हे जुने प्रकरण असून पुन्हा उकरून काढले आहे, अशी चर्चा होत आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ही कारवाई बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून केलीय.

आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सुमारे ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळकविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला होता. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हे अडचणीमध्ये आलेत.