परमबीर सिंह बेपत्ता; राज्य सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

Parambir singh - TOD Marathi

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली.

आता परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळलं जाण्याची शाश्वती देता येणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर खुद्द परमबीर सिंह यांच्यावर देखील अनेक आरोप झाले.

परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र, समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्यामुळे परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.

Please follow and like us: