TOD Marathi

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि त्या अनुषंगाने उलगडलेलं वसुली प्रकरणावरुन चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परमबीर सिंह कुठे आहेत याबाबत एक ट्वीट केलं आहे.

हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का, असं संजय निरुपम म्हणाले आहे.

परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच अँटिलिया बॉम्ब प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंह यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंह सुट्टीवर गेलेल होते. तसेच त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून परमबीर सिंह फरार आहेत.