TOD Marathi

अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेकवर्ष ती मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमात तिने काम केला आहे. तिच्या अभिनयनाने तिच्या सौंदर्याने ती नेहमी प्रेक्षकांचं मन जिंकत असतं पण यावेळी तिने एक सर्वसाधारण गोष्ट करून प्रेक्षकांचं मन जिंकला आहे. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यावरून तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे कारण सामान्य मुंबईकराच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या एका गोष्टीविषयी तिने शेअर केल आहे. मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे ‘बेस्ट’. मुक्ताने अलीकडेच मुंबईत फिरताना बेस्ट बसने प्रवास केला (An integral part of Mumbaikar’s life is ‘best’. Mukta traveled by Best Bus while traveling in Mumbai recently). बेस्ट पर्सनल प्रवास करणारी गोष्ट हे अत्यंत सर्वसाधारण गोष्ट आहे आणि या सर्वसाधारण गोष्टींने मुक्ताने प्रेक्षकांचं मन जिंकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)


या बेस्टविषयी लिहित तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि म्हटलं अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षावाल्यांकडून लांबचे किंवा अगदी जवळचेही भाडे नाकारले जाते. कधी कधी असेही घडते की नेमके कुठेतरी जायचे असते तेव्हा रिक्षा-टॅक्सी उपलब्ध होत नाहीत. अशावेळी मुंबईकरांचा मोर्चा बेस्टकडे वळतो. असाच काहीसा प्रकार मुक्तासोबत घडला.रिक्षा आणि टॅक्सी न मिळाल्याने मुक्ताला बेस्टची निवड करावी लागली. मुक्ताने बसमध्ये बसलेला फोटो शेअर करत म्हटले की, ‘जेव्हा रिक्षा-टॅक्सी असे काहीच नसते, तेव्हा बेस्ट ही बेस्ट ठरते (Mukta shared a photo of herself sitting in a bus and said, ‘When there is no such thing as a rickshaw-taxi, the best is the best).’ मुक्ताने तिच्या पोस्टमध्ये #mumbaimerijaan, #ilovemumbai, #BESTmumbai असे हॅशटॅगही वापरले आहेत.

मुक्ता मुळची पुण्याची आहे. पण कामानिमित्त मुंबईशी तसा तिचा अनेक वर्ष संबंध आहे. त्यामुळे मुंबईत प्रवास करणं तिच्यासाठी नवीन नाही. पण एवढी लोकप्रिय अभिनेत्री असूनही तिने मुंबईत प्रवासासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर केल्याने मुक्ताचे कौतुक होत आहे.