TOD Marathi

नाशिक-सिन्नर महामार्गावर मोठा अपघात…

नाशिक सिन्नर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या संपायच नाव घेत नाही. मागच्या आठवड्यात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला होता (A major accident took place on Nashik-Sinner highway, the ST bus caught fire crushing three to four bikers).

या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा हा अपघात झाला (The accident involving three vehicles took place near Shinde Palase toll booth). भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात आतापर्यंत चार ते पाच दुचाकीस्वारांचा जणांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या. त्याचबरोबर, आज सिन्नर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या देवपुर जवळ सकाळी सात वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने तवेरा जीप उलटली आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर सात साई भक्त गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.