TOD Marathi

मुंबई: आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्य नवाजुद्दीन सिद्दिकीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे तो कुठल्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचा धंदा झाल्याचं मत त्याने व्यक्त केलंय. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत हा निर्णय जाहीर केलाय.

मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊससाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा झालाय. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डंपिंग ग्राऊंड’ बनलंय. सध्या या ठिकाणी असे शो आहेत जे एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वल आहेत ज्यामध्ये नवं काहीच सांगण्यासारखं नाही, असंही तो यावेळी म्हणाला.

मला जर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो पाहणंही शक्य होत नसेल तर मी त्यात कसं काम करू? या स्टार व्यवस्थेने मोठ्या पडद्याला खाऊन टाकलं. आता आमच्यासारखे तथाकथित ओटीटी स्टार मोठ्या पैशाची मागणी करतात आणि बॉलीवूड ए-लिस्टर्ससारखे ताशेरे ओढतात. कंटेंट हाच निर्णायक आहे हे ते विसरले आहेत, अशी टीका देखील त्याने केली आहे.