TOD Marathi

दुबई: T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आता भारतासाठी एक संधी निर्माण झाली आहे. सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात आज न्यूझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचा रस्ता खडतर होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करु शकत नाही, त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी दिली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ रविवारी मैदानात उतरणार आहे.

सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास शार्दुल ठाकूर तितका सक्षम नसल्याचं दिसतेय. गोलंदाजीविषयी बोलायचं झाल्यास, शार्दुल ठाकूर विकेट घेण्यास सक्षम आहे. मात्र, तो प्रतिषटक 9 धावा देतो. दुसरीकडे हार्दिक पांड्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.