TOD Marathi

टिओडी मराठी, कोलंबो, दि. 28 जुलै 2021 – कृणाल पांड्या हा खेळाडू मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना होऊ शकला नाही. मात्र, आता भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यावरचे संकट दूर झालंय. बुधवारी 8 वाजता दुसरी टी-20 मॅच होणार आहे. टीम इंडियाचे 9 खेळाडू T20 सीरिजमधून बाहेर होणार आहेत. तर, 5 नेट खेळाडूंना संधी मिळणार आहेत. मात्र, कोण आहेत ते खेळाडू?, यायची नाव अद्याप जाहीर केलेली नाहीत.

कृणाल पांड्यासह 9 खेळाडू टी-20 सीरिजमधून बाहेर झालेत, तर 5 नेट बॉलर्सना टीम इंडियामध्ये संधी मिळालीय. इशान पोरेल, संदीप वॉरियर, साई किशोर, अर्शदीप सिंग आणि सिमरजीत सिंग यांना नेट बॉलर म्हणून श्रीलंकेला नेमलं होतं. पण, आता त्यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळालंय.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवनच टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पण 9 खेळाडू बाहेर झालेत. या 9 खेळाडूंमध्ये कोणाचं नाव आहे?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन आता हि टी-20 सीरिज खेळणार नाही.

शिखर धवन देखील टी-20 सीरिजमधून बाहेर झालाय. तर भुवनेश्वर कुमार टीमचं नेतृत्व करणार आहे, असं समजतंय. पण, शिखर धवन बुधवार आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे, हे आता स्पष्ट केलं आहे.