TOD Marathi

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांचा ‘डबल एक्सएल’ (Double XL) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. आपल्या स्वप्नांच्या शोधात असलेल्या दोन प्लस-साइज महिलांची ही कथा आहे. नवी दिल्ली, मेरठ आणि मुंबईवर आधारित या चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्यासोबत सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटातून आणखी एक मोठे सरप्राईज उलगडण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील ‘डबल XL’ (Double XL) मध्ये एका खास स्टाईलमध्ये दिसणार आहे.

या बहुचर्चित चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे (Indian cricketer Shikhar Dhawan will make his debut in Bollywood). परंतु या चित्रपटात शिखर धवन मुख्य अभिनेता म्हणून झळकणार नाहीये. तर तो एका महत्वाच्या भूमिकेत गेस्ट अपिरिअन्स करणार आहे. सध्या शिखरचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. हुमासोबतच शिखरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी समोर आलेली नसली तरी या चित्रपटाचा विषय सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या वजनदार या मराठी चित्रपटाला मिळता जुळता आहे.

या चित्रपटाचा टीजर समोर आल्या पासून शिखर धवनचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.या चित्रपटाबाबत बोलताना शिखर धवनने सांगितलं की, त्याचा निर्णय अगदी सोपा होता. तो म्हणतो, “देशासाठी खेळणारा खेळाडू म्हणून आयुष्य नेहमीच व्यस्त असते. चांगले मनोरंजक चित्रपट पाहणे हे माझे आवडते काम आहे. जेव्हा ही संधी माझ्याकडे आली आणि मी ती कथा ऐकली तेव्हा त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. हा चित्रपट संपूर्ण समाजासाठी एक सुंदर संदेश आहे. आणि मला विश्वास आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणतीही मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करण्यापासून माघार घेणार नाही.ती तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहतील. डबल एक्सएल 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. गुलशन कुमार, टी-सीरीज, वाकाओ फिल्म्स आणि मुदस्सर अझीझ यांनी हा चित्रपट सादर केला आहे.