TOD Marathi

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 23 जून 2021 – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यांनतर भाजपमधील 24 हून अधिक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यातच आता 200 कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडून पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हुगळी जिल्यात कार्यकर्त्यांनी गंगाजलने शुद्धीकरण करत भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं म्हणत टीएमसीमध्ये प्रवेश घेतला आहे. टीएमसीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेत स्वःताच्या अंगावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलंय. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यादरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे कार्यकर्ते पुन्हा टीएमसीमध्ये जात असल्याचा दावा केलाय. आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेची भीती असल्याने कार्यकर्ते भीतीपोटी प्रवेश करत आहे. त्यांच्यावर जबरदस्ती केली जात आहे, असं भाजपने म्हटलं आहे.