TOD Marathi

टिओडी मराठी, इस्लामाबाद, दि. 23 जून 2021 – मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या लाहोर इथल्या घराबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10-20 लोकं जखमी झालेत. या स्फोटामुळे पाकिस्तानामध्ये एकच खळबळ माजली आहे. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरी होता का?, हे समजलेले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झालाय. घटनास्थळी सुरक्षापथक दाखल झालेले आहे. आंतरराष्ट्रीय एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळ एका घरात हा स्फोट झालाय.

या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये-जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरी होता का?, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.

तर, पाकिस्तानी चॅनल ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 2-3 लोकं किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. यात 4 जण गंभीर जखमी असून त्यांना ICU मध्ये दाखल केलं आहे.

पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे. हा स्फोट पाइपलाइन गॅसचा आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.