पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट?; कलम 144 लागू

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवा देशात मोठ्या प्रमाणत सुरू आहेत . त्यामुळे शहरातील बनी गालाजवळील भागात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आल्याचे इस्लामाबाद पोलिसांनी म्हटले आहे.

इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहितीही इस्लामाबाद पोलिसांनी सांगितलं आहे.

सुरक्षा विभागाने बनी गाला येथे विशेष सुरक्षा तैनात केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बनी गालामधील लोकांची यादी अद्याप पोलिसांना देण्यात आलेली नाही. इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू आहे आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोणत्याही सभेस परवानगी नाही.

दरम्यान इम्रान खान यांना कायद्यानुसार संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल आणि इम्रान यांच्या सुरक्षा पथकानेही तेच करणे अपेक्षित आहे, असे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Please follow and like us: