करण जोहरची बर्थडे पार्टी नव्हे करोना हॉटस्पॉट ?

मुंबई:
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा नुकताच ५० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता या पार्टीबद्दल आणखी एक धक्कादायक बाब पुढं येताना दिसतेय. ही पार्टी करोनाचा हॉटस्पॉट ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार करणच्या या ग्रॅंड पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी ५० ते ५५ जणांना करोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या वर्षी देखील करणच्या घरी झालेली पार्टी याच कारणामुळं चर्चेत आली होती. या पार्टीनंतर करण, अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली होती.

Leave Your Comment