TOD Marathi

काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार; भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुनावले खडेबोल

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील महिला सचिव स्नेहा दुबे यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि पाठिंबा देणं हे पाकिस्तानच्या इतिहासात आणि रणनितीमध्ये आहे. तसंच पाकिस्तानने अवैधरित्या ताबा मिळवेलला भागसुद्धा भारताचाच आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य असे भाग होते, आहेत आणि राहतील.

इम्रान खान यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारताने जम्मू काश्मीर आणि लडाख आमचेच असल्याचं स्पष्ट ठणकावून सांगितलं आहे. तसंच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं स्नेहा दुबे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. त्याआधी भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.