TOD Marathi

परभणी: आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी परीक्षार्थींना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) आरोग्यसेवेतील पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी आवश्यक प्रवेश पत्रच अनेक विद्यार्थ्यांना शुक्रवारी रात्रीपर्यंत मिळाले नाही. ज्यांना मिळाले त्यांच्या प्रवेश पत्रात परीक्षा केंद्राबद्दल प्रचंड गोंधळ होता.

राजेश टोपे म्हणाले की, विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला याला न्यासा ही संस्था जबाबदार आहे. त्यांच्या असमर्थतेमुळे ही परीक्षा पुढे ढकलली. मी आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून तुमची माफी मागतो, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

भरती प्रक्रियेसाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो आणि याला मान्यता मिळवून घेतली. वर्षानुवर्षे रिक्त जागा आणि त्या संदर्भातील निर्णय़ घेण्यात आला होता. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचं मला दु:ख. ही परीक्षा आठवड्याभरात किंवा दहा दिवसात घेण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासनही यावेळी राजेश टोपेंनी दिलं.