TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 5 सप्टेंबर 2021 – पाकिस्तानमध्ये एक आत्मघातकी स्फोट झाला असून या स्फोटात आतापर्यंत चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण गंभीर जखमी झालेत. यातील जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

बलुचिस्तानची प्रांताची राजधानी क्वेटा शहरामध्ये हा आत्मघाती स्फोट झाला असून हा स्फोट इतका भीषण होता की त्यात पाकिस्तानच्या निमलष्करी दलाच्या तीन सैनिकांचा जागीच मृत्यू झालाय. एका सैनिकाला रुग्णालयात दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जवाबदारी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.