TOD Marathi

काँग्रेस नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधल्यानंतर गुरुवारी संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेत्याने राष्ट्रपतींबाबत या शब्दाचा वापर केल्याने भाजप नेत्यांकडून या शब्दाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांच्या या शब्दप्रयोगावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर भाजप सदस्यांनी त्यांच्याकडे माफी मागावी अशी मागणी केली, त्याला त्यांनी नकार देत एक शब्द चुकून उच्चारला गेल्याचे म्हणत माफी न मागण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर आता या वादावर अधीर रंजन चौधरी यांनी याप्रकरणी माफी मागितली असल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हटले आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी उच्चारलेला शब्द देशासाठी घृणास्पद आणि संस्कृतीविरोधी असल्याचे भाजपने म्हटले आहे. देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या आदिवासी महिलेच्या अपमानाबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर आता सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देत अधीर यांनी याप्रकरणी माफी मागितली असल्याचे म्हटले आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी अलीकडे एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणून संबोधित केले होते. तेव्हापासून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझ्या तोंडून चुकून एक शब्द बाहेर पडला. ज्याचा आपल्या खूप खेद असून, भाजपकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते या प्रकरणाचा राईचा पर्वत करत असल्याचे म्हटले आहे.