TOD Marathi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला आहे. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मन की बातमध्ये मोदी म्हणाले की, चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी (Sridevi Vardrajanji) यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.’मन की बात’ च्या पुढच्या भागात तुम्ही बाजरीवर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे, असं मोदींनी यावेळेस सांगितलं.

विशेष म्हणजे हा प्रस्ताव भारताने पाठवला होता. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल, असंही पंतप्रधान यावेळेस म्हणाले आहेत.

दरम्यान जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात यावेत, असं आवाहनही मोदींनी नागरिकांना केलं आहे.