TOD Marathi

पिंपळनेर : महाराष्ट्राला चालना व दिशा देण्यासाठी शिंदे सरकार प्रयत्नशील आहे. तुम्ही फक्त मंजुळा गावित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, एमआयडीसीची (MIDC) वीस वर्षे जुनी मागणी फक्त सहा महिन्यात पूर्ण करू, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Ministry of Industries Uday Samant) यांनी दिलंय.

सामंत याठिकाणी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत, टीका करणाऱ्यांना बोलू द्या, पण महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) आहेत. आता आम्ही पन्नास आमदार आहोत नंतर शंभर होऊ.

तसेच विकास कामे आम्ही जोमाने करू, रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक मालकांसाठी व त्यांच्या परिवारासाठी महामंडळ सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सरपंचांचा मानधन वाढीसाठी प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी यावेळेस दिलं आहे.

दरम्यान आमदार मंजुळा गावित यांना मंत्रिपद मिळावे अशी नागरिकांनी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रामुख्याने मांडू. हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी नमूद केले.