TOD Marathi

नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) सरकार पडल्यावर शिंदे-फडणवीसांनी ( Shinde Fadanivs Goverment) सत्ता स्थापन केली. नवीन सरकार आल्यापासून राज्यात बरेच सत्तानाट्य बघायला मिळालं.

शिवसेनेची दिवसागणिक कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून होतोय. अशातच आता भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित ( Home Minister Amit Shaha) शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

शिवसेनेला ( Shivsena) पूर्णपणे संपवण्यासाठी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आक्रमकपणे कामाला लागलाय. महापालिकेची ही लढाई लढण्यासाठी अमित शाह मैदानात उतरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शाह गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतदौरा करणार आहेत.

दरम्यान शाह हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येतील. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर आपल्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ते मुंबईतील प्रसिद्ध लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

अमित शाह २०१७ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला न चुकता येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.