TOD Marathi

टिओडी मराठी, जीनिव्हा, दि. 23 मे 2021 – जगावर आलेले कोरोना संकट नष्ट करण्यासाठी एक प्लॅन आखला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 50 अब्ज डॉलरचा (सुमारे 3 लाख 75 हजार कोटी रुपये) एक लसीकरण प्लॅनचा प्रस्ताव आहे. कारण, हे कोरोना संकट कधी संपणार? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

या प्लॅनअंतर्गत 2021च्या अखेरीस किमान 40 टक्के जागतिक लोकसंख्या व 2022 च्या पहिल्या सहामाहीत किमान 60 टक्के जागतिक लोकसंख्येचे लसीकरण करण्यात येऊ शकते.

आयएमएफने म्हटले आहे की, असे करणे म्हणजे 2025 पर्यत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 9 ट्रिलियन डॉलरचे भांडवल ओतण्यासारखे आहे. या प्लॅनमुळे अर्थव्यवस्थांना चालना मिळणार असून याचा फायदा बहुतांशपणे श्रीमंत देशांना मिळेल.

आयएमएफच्या प्रकल्प संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी आरोग्य शिखर परिषदेत म्हटले की, सध्या सक्षम आणि सर्वसमावेशक कामाची आवश्यकता आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवांबाबत थोड्याशा आर्थिक मदतीने जग या अभूतपूर्व आरोग्य व आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

गेल्या काही काळापासून आम्ही अर्थव्यवस्था कोसळण्याच्या संदर्भात चेतावणी देत आहे. करोनाची लस मिळवू शकणारे श्रीमंत देश आणि लस मिळू न शकणारे गरीब देश यांच्यातील अंतर वाढल्याने परिस्थिती आणखी भयावह होणार आहे.

तसेच लसीकरणाचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोव्हॅक्‍सला अतिरिक्त आर्थिक मदत करण्याची आणि अतिरिक्‍त लसचे डोस दान करण्याची, कच्चा माल आणि लस यांचे सीमेपलीकडे मुक्तपणे पुरवठा करण्याची गरज आहे.

आयएमएफच्या प्रकल्प संचालकांनी सांगितले की, दुसरा मुद्दा असा आहे कि, विषाणूच्या नव्या प्रकारांपासून संरक्षण देणे. याचा अर्थ अतिरिक्त लस उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करणे, त्यासाठी देखरेख आणि पुरवठा वाढवणे आणि विषाणूच्या स्वरूप बदलण्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपत्कालीन योजना बनवणे यांचा समावेश यात आहे.

आणि तिसरा मुद्दा असा आहे, ज्या भागात लस पुरेशी उपलब्ध नाही, त्या भागात पुरेशी देखरेख, नियंत्रण करणे, औषधे आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करणे आणि त्याचवेळेस लस देण्याची तयारी करणे.

यावेळी जॉर्जिवा यांनी सांगितले की, हा प्रस्ताव आर्थिक अनुदान, राष्ट्रीय सरकारी यंत्रणा आणि आर्थिक मदतीला धरून सुमारे 50 अब्ज डॉलरचा आहे.