TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 सप्टेंबर 2021 – कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नवनवीन संशोधन करुन या विषाणूवर अभ्यास केला जात आहेत. अभ्यासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यात आता आणखी एका माहितीची भर पडलीय.

कोरोनाने गेल्या दीड वर्षात लोकजीवन विस्कळीत करुन टाकलं आहे. मात्र, हा कोरोना सुमारे 21 हजार वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात होतं, असा धक्कादायक खुलासा ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी केलाय. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोनाच्या इतिहासावर संशोधन केलं. संशोधकांनी जो काळ अपेक्षित धरला होता त्यापेक्षा एक-दोन नव्हे तर 30 पट मागे याचं अस्तित्व सापडलं आहे.

याविषयी बोलताना महॅन गॅफरी यांनी असे म्हटलं की, कोरोना विषाणूचे मूळ हे 21 हजार वर्षापूर्वीच अस्तित्वात होतं. हे संशोधन करण्यासाठी मानवाच्या RNA आणि DNA मध्ये भूतकाळात काय बदल झालेत?, याचाही अभ्यास करावा लागला.

कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातोय. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी लसीकरण करणं आवश्यक आहे. याशिवाय लसीकरण केलेल्या नागरिकांना अनेक गोष्टींत मुभा मिळत आहे, असे पहायला मिळत आहे.